Monday, February 19, 2018
Wednesday, January 10, 2018
निःशब्द
निःशब्द
कित्येकदा-
आषाढमेघ मनात गच्च दाटतात
आतून दाट दाट कढ फुटतात
तेव्हा शब्दांचे सड झरतील असे वाटतात
सांत्वनाचे मेघ बरसतीलसे वाटतात
पण-
नेहमीच सोबत करतात असे नाही
बऱ्याचदा परागंदा असतात शब्द
तेव्हा सहाव्या महिन्यातच जन्मतात
माझ्या कित्येक कविता निःशब्द.
--- गणेश गोडसे ---
कित्येकदा-
आषाढमेघ मनात गच्च दाटतात
आतून दाट दाट कढ फुटतात
तेव्हा शब्दांचे सड झरतील असे वाटतात
सांत्वनाचे मेघ बरसतीलसे वाटतात
पण-
नेहमीच सोबत करतात असे नाही
बऱ्याचदा परागंदा असतात शब्द
तेव्हा सहाव्या महिन्यातच जन्मतात
माझ्या कित्येक कविता निःशब्द.
--- गणेश गोडसे ---
Thursday, January 4, 2018
झुंबर
झुंबर
दुःखाचं छताला उलटं लटकलेलं
बहुरंगी गढूळ झुंबर
मध्यरात्री नंतरही पापण्यांना भेटू देत नाही
घड्याळ टिकटिकत राहतं
त्या लयीवर
झुंबर मस्तवालपणे राहतं झुलत...
मेंदूचा वेध घेत खेळवत राहतं पापण्यांना,
मेंदूच्या ठिकऱ्या करून
भयाण खिदळत राहतं,
...दुःखाचं छताला उलटं लटकलेलं
बहुरंगी गढूळ झुंबर तोपर्यंत हसत राहतं
जोपर्यंत आपलं 'हसणं' त्याच्यात मिसळत नाही...
मग पुन्हा आपल्यातच येऊन रुजतं,
ओघळतं...
अंगाखांद्यावरून..
चेहऱ्यावरून...
दाढीमिशांमधून....
अन ओघळत राहतं,
उगम पावल्यासारखं,
डोळ्यांमधून.....
...दुःखाचं छताला लटकलेलं
बहुरंगी गढूळ झुंबर.
----- गणेश गोडसे ----
दुःखाचं छताला उलटं लटकलेलं
बहुरंगी गढूळ झुंबर
मध्यरात्री नंतरही पापण्यांना भेटू देत नाही
घड्याळ टिकटिकत राहतं
त्या लयीवर
झुंबर मस्तवालपणे राहतं झुलत...
मेंदूचा वेध घेत खेळवत राहतं पापण्यांना,
मेंदूच्या ठिकऱ्या करून
भयाण खिदळत राहतं,
...दुःखाचं छताला उलटं लटकलेलं
बहुरंगी गढूळ झुंबर तोपर्यंत हसत राहतं
जोपर्यंत आपलं 'हसणं' त्याच्यात मिसळत नाही...
मग पुन्हा आपल्यातच येऊन रुजतं,
ओघळतं...
अंगाखांद्यावरून..
चेहऱ्यावरून...
दाढीमिशांमधून....
अन ओघळत राहतं,
उगम पावल्यासारखं,
डोळ्यांमधून.....
...दुःखाचं छताला लटकलेलं
बहुरंगी गढूळ झुंबर.
----- गणेश गोडसे ----
Sunday, December 31, 2017
आई
आई
रात्रीतून,
तीनतीनदा उठून…
पांघरूणातून बाहेर
आलेले
इवले इवले
हात पाय
आई लपेटते
पुन्हा
पुन्हा
मायेच्या गोधडीत…
अंथरूण झालेलं
पांघरूण
पुन्हा करते
नेटकं.
आईच्या अंगी
साठत जाते उब
ईश्वराच्या मनातल्या
गाभ्यातली.
आई होत
जाते
अधिकाधिक उबदार
पौषातल्या चढत्या
थंडीच्या प्रत्येक रात्रीबरोबर…
31/12/2017
-- गणेश गोडसे ---
Saturday, December 30, 2017
सखा
आनंदाने माझ्याशी फारकत घेतली
त्याला खूप युगे लोटली...
मी
एकाकी असाच
आनंद सहृदयी मात्र
अजूनही
सांत्वनासाठी येतो
कधीमधी
माझ्याकड़े
माझा भलताच
सहनशील सखा...
Wednesday, November 29, 2017
दोघांती
मी बोललो तुझ्याशी जरी नाही, तुझ्याशीच मी बोलत होतो
रिमझिम तुझ्या आठवांची ती , मी बरसात झेलत होतो
माझ्या एकांताच्या मैफिलीत, नव्हतीस जरी सोबत तू
एकटाच चंद्र तो नभातला परी, मी दोघांती पहात होतो
नव्हतीस तू माझी अन, मीही नव्हतो तुझा कधी
तुझ्यासोबतच परंतु ते सारे, मी बहर झेलत होतो
निरोपाची होती तुला घाई, भेटलीस मावळत्या सूर्यासारखी
तरी चांदण्यात तुझ्या पौर्णिमेच्या मी अखंड नहात होतो
धुक्यात भेटलीस तू अन, आणखी गर्द होत गेलीस
अदृश्य तू होताना मी तुला माझ्यात लपवत होतो
----- गणेश गोडसे -----
abhijatjavita.blogspot.in
Friday, November 24, 2017
चला हूं मैं
आपणही lyrics लिहावं असं वाटायचं तेव्हा
वयाच्या 17 व्या वर्षी.
तेव्हा लिहलेलं हे lyric
डुबताही चला हूं मैं, हसीन तेरे इन खयालोमें
तुभी आ हो आ शामिल, तेरे रंगमे रंगी इन बातोमें
इंतजार है तेरा
मेरे हर एक पल को
इंतजार होगा तेरा
मेरे आनेवाले कल को
खो नही सकता ये कभी, इस आसमा की छाव में
डुबताही चला हूं मैं, हसीन तेरे इन खयालोमें
तुभी आ हो आ शामिल, तेरे रंगमे रंगी इन बातोमें
मंजिल तो नहीं है नजरमे,
पर राहें बडी सुहानी हैं
यहाकि घटा यहाकि पवन
यहा की धूल भी तो दिवानी है
देख कही मिटा न दु मै खुदको इनही दिवानी बातोमें
डुबताही चला हूं मैं, हसीन तेरे इन खयालोमें
तुभी आ हो आ शामिल, तेरे रंगमे रंगी इन बातोमें
वयाच्या 17 व्या वर्षी.
तेव्हा लिहलेलं हे lyric
डुबताही चला हूं मैं, हसीन तेरे इन खयालोमें
तुभी आ हो आ शामिल, तेरे रंगमे रंगी इन बातोमें
इंतजार है तेरा
मेरे हर एक पल को
इंतजार होगा तेरा
मेरे आनेवाले कल को
खो नही सकता ये कभी, इस आसमा की छाव में
डुबताही चला हूं मैं, हसीन तेरे इन खयालोमें
तुभी आ हो आ शामिल, तेरे रंगमे रंगी इन बातोमें
मंजिल तो नहीं है नजरमे,
पर राहें बडी सुहानी हैं
यहाकि घटा यहाकि पवन
यहा की धूल भी तो दिवानी है
देख कही मिटा न दु मै खुदको इनही दिवानी बातोमें
डुबताही चला हूं मैं, हसीन तेरे इन खयालोमें
तुभी आ हो आ शामिल, तेरे रंगमे रंगी इन बातोमें
Thursday, November 23, 2017
चांदण्यात तुझे कवडसे
संभ्रमात मी सखे...
संभ्रमात मी सखे
का चांदण्यात तुझे कवडसे
चालतो एकटाच मी
वाटेवरी तुझे ठसे
भास हे हवे हवे
पुन्हा पुन्हा तुझे उन्मेष नवे
पापण्यातले माझ्या
बेभान हे हिरवे थवे
संभ्रमात मी सखे
का चांदण्यात तुझे कवडसे
अथांग विश्व हे उभ
व्यापून त्याला फक्त तूच उरे
दाही दिशा उण्याच आता
सारीकडे तुझेच सडे
संभ्रमात मी सखे
का चांदण्यात तुझे कवडसे
नादातूनी तूच बोले
वाऱ्यातूनी वाहणे तुझे
बरसतेस होऊन पाऊस तू
अंकुरणे हे हिरवे माझे
संभ्रमात मी सख
का चांदण्यात तुझे कवडसे
-----/गणेश गोडसे/-----
संभ्रमात मी सखे
का चांदण्यात तुझे कवडसे
चालतो एकटाच मी
वाटेवरी तुझे ठसे
भास हे हवे हवे
पुन्हा पुन्हा तुझे उन्मेष नवे
पापण्यातले माझ्या
बेभान हे हिरवे थवे
संभ्रमात मी सखे
का चांदण्यात तुझे कवडसे
अथांग विश्व हे उभ
व्यापून त्याला फक्त तूच उरे
दाही दिशा उण्याच आता
सारीकडे तुझेच सडे
संभ्रमात मी सखे
का चांदण्यात तुझे कवडसे
नादातूनी तूच बोले
वाऱ्यातूनी वाहणे तुझे
बरसतेस होऊन पाऊस तू
अंकुरणे हे हिरवे माझे
संभ्रमात मी सख
का चांदण्यात तुझे कवडसे
-----/गणेश गोडसे/-----
Wednesday, October 11, 2017
व गै रे ...
व गै रे...
जपून ठेवलेला अश्रू
कधी उद्दाम होतो...
अन ओघळतोच.
दबा धरून बसलेली
दुःखाची श्वापदं
जन्माची असतात उपाशी
त्यांना नाहीच रोखता येत.
आपण चुकीच्या जगात जन्म घेतल्यासारखे
असहाय्य
एकाकी
व गै रे ...
गणेश गोडसे
abhijatkavitablogspot.in
Monday, February 27, 2017
भरकटली दुपार...
मुकी झाडं
स्तब्ध पानं
उन्हाचं रंगतं गाणं...
वाट मोजते
सरकते क्षण
मातीच्या पोटी भणभण...
उर दाटला
ओठी तहान
अवघे व्याकूळ पंचप्राण ...
दूर आकाशी
पेटला वन्ही
धग धरतीच्या अंगणी ...
दूर क्षितीजाला
डोंगरांची किनार
सावल्यांसवे एक भरकटली दुपार...
---गणेश गोडसे---
चांदण्या
पूर्वी,
तू
हसायचीस तेव्हा,
चांदण्या
कशा रांगेत उभ्या रहायच्या,
कवायतीला
उभं राहणाऱ्या शाळकरी मुलांसारख्या.
पण
आज,
तू
हसलीस तेव्हा ,
चांदण्या
उधळल्यासारख्या वाटल्या,
मैदान
कवेत घेणाऱ्या शाळकरी मुलांसारख्या...
---गणेश गोडसे---
Saturday, February 25, 2017
आई
पावसाचे मोसम आई
किती उलटून गेले
तरी सांग तुझे हात
दुष्काळाशीच कसे लढले
मुक्त वगैरे होता हा देश
तू जन्मलीस तेव्हा आई
या बहरलेल्या वृक्षाचं
एकही फळ तुझ्या पदरात नाही
देशभर सोन्याचा मस्तवाल धूर
भरगच्च होती कोठारं धान्यांची
त्या देशात आयुष्यभर आई
तू करत राहीलीस काटकसर तेलामीठाची
इरकल पैठणी कांजीवरमची
परंपरा मिरवणाऱ्या देशात आई
तुझ्या लुगड्याचा जोड
कधी सुटलाच नाही
प्रसूतीच्या कळा उरात गाडून
तूच दाखवंलस आकाश
तरी विन्मुख कसा सांग
तुला सारा प्रकाश
आयुष्यभर चार भिंतीत राहूनसुद्धा
साऱ्या विश्वाचं दुःख तुझ्या कपाळी कसं ?
आनंदाचं गाणं झऱ्यासारखं प्रसवूनसुद्धा
वेदनेत अखंड नहाणं तुझ्या भाळी कसं ?
किती उलटून गेले
तरी सांग तुझे हात
दुष्काळाशीच कसे लढले
मुक्त वगैरे होता हा देश
तू जन्मलीस तेव्हा आई
या बहरलेल्या वृक्षाचं
एकही फळ तुझ्या पदरात नाही
देशभर सोन्याचा मस्तवाल धूर
भरगच्च होती कोठारं धान्यांची
त्या देशात आयुष्यभर आई
तू करत राहीलीस काटकसर तेलामीठाची
इरकल पैठणी कांजीवरमची
परंपरा मिरवणाऱ्या देशात आई
तुझ्या लुगड्याचा जोड
कधी सुटलाच नाही
प्रसूतीच्या कळा उरात गाडून
तूच दाखवंलस आकाश
तरी विन्मुख कसा सांग
तुला सारा प्रकाश
आयुष्यभर चार भिंतीत राहूनसुद्धा
साऱ्या विश्वाचं दुःख तुझ्या कपाळी कसं ?
आनंदाचं गाणं झऱ्यासारखं प्रसवूनसुद्धा
वेदनेत अखंड नहाणं तुझ्या भाळी कसं ?
Friday, February 24, 2017
तुला घरच नाही
"तुझ्या घराला तू घर का म्हणत नाहीस ?"
असं विचारलं तेव्हा,
किती भयाण हसलास तू.
म्हणालास-
"खोलीच ती.
दहा बाय दहाच्या त्या खोलीला
घर म्हणावसं वाटत नाही,
अन त्या बकाल वस्तीला शहर."
परवा
तुझ्या वडिलांचं प्रेत
त्या खोलीच्या दारासमोर ठेऊनच,
साऱ्यांनी घातलेला गहीवर बघितला
तेव्हा मलाही पटलं,
तुला घरच नाही
गणेश गोडसे
.
गणेश गोडसे
.
Thursday, February 23, 2017
भूकबळी आणि आत्महत्या
भूकबळी आणि आत्महत्या,
हे व्यवस्थेने केलेले खून आहेत...
असं जेव्हा तू म्हणालास -
तेव्हा दचकून मागे फिरलेले लोक
प्रस्थापितांच्या पायाशी जाऊन बसले...
चढत्या आणि उतरत्या आकडेवारीचे घोळ ऐकून
त्यांनी आनंदाने टाळ्या पिटल्या
त्या भाटांनी मग तुला शिव्या घातल्या
आपले अमोल आत्मे कत्तलखान्याच्या खुंटीवर टांगून
उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे फलक हाती घेऊन ते बाहेर पडले
त्यांच्या काखेतल्या झोळीतील मूठ-मूठ सत्ता ते चाचपून पाहत होते,
क्रांती झाल्यासारखा प्रचंड जल्लोष करत होते
अन उद्याच्या महासत्तेचे ढोल बडवत होते
तू तारस्वरात ओरडत होतास
भूकबळी आणि आत्महत्या ...
पण खरं सांग
त्या पाताळभेदी जल्लोषात तुझा आवाज तुला तरी ऐकू येत होता का?
हे व्यवस्थेने केलेले खून आहेत...
असं जेव्हा तू म्हणालास -
तेव्हा दचकून मागे फिरलेले लोक
प्रस्थापितांच्या पायाशी जाऊन बसले...
चढत्या आणि उतरत्या आकडेवारीचे घोळ ऐकून
त्यांनी आनंदाने टाळ्या पिटल्या
त्या भाटांनी मग तुला शिव्या घातल्या
आपले अमोल आत्मे कत्तलखान्याच्या खुंटीवर टांगून
उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे फलक हाती घेऊन ते बाहेर पडले
त्यांच्या काखेतल्या झोळीतील मूठ-मूठ सत्ता ते चाचपून पाहत होते,
क्रांती झाल्यासारखा प्रचंड जल्लोष करत होते
अन उद्याच्या महासत्तेचे ढोल बडवत होते
तू तारस्वरात ओरडत होतास
भूकबळी आणि आत्महत्या ...
पण खरं सांग
त्या पाताळभेदी जल्लोषात तुझा आवाज तुला तरी ऐकू येत होता का?
-----गणेश गोडसे-------
Wednesday, February 22, 2017
त्या मंद अंधारात
त्या मंद अंधारात
त्या मंद अंधारात
रजईच्या कुशीत
तेवत असतात
माझे दोन डोळे
तुझ्या आठवणीत....
तेव्हा,
ओघळत असतं,
तुझं हसू -
माझ्या मनावरून
अन
तुझ्या शब्दांची आवर्तनं
स्निग्ध मायाळ त्या रात्रीवरून...
----------गणेश गोडसे-----------
त्या मंद अंधारात
रजईच्या कुशीत
तेवत असतात
माझे दोन डोळे
तुझ्या आठवणीत....
तेव्हा,
ओघळत असतं,
तुझं हसू -
माझ्या मनावरून
अन
तुझ्या शब्दांची आवर्तनं
स्निग्ध मायाळ त्या रात्रीवरून...
----------गणेश गोडसे-----------
Tuesday, February 21, 2017
.... बरं असतं
.... बरं असतं
हाकणाऱ्याचं आपलं बरं असतं
ओढणाऱ्याला मात्र ओढावं लागतं
अन ओढणारे ओढून मेले तरी
नाव मात्र हकणाराचंच होतं
सेनापतीचं आपलं बरं असतं
सैन्याला मात्र लढावं लागतं
अन लढणारे लढून मेले तरी
सेनापतीलाच इतिहासात नोंदवावं लागतं
निर्मिकाचं आपलं बरं असतं
भोग मात्र आपण भोगतो
अन कितीही भोगलं तरी
नाव मात्र त्याचंच घेतो
फार थोड्यांचंच असं बरं असतं
बाकीच्यांचं काही खरं नसतं
आपणच त्यांना मोठे करतो
अन आपणच शेवटी खोटे ठरतो
ओढणाऱ्याला मात्र ओढावं लागतं
अन ओढणारे ओढून मेले तरी
नाव मात्र हकणाराचंच होतं
सेनापतीचं आपलं बरं असतं
सैन्याला मात्र लढावं लागतं
अन लढणारे लढून मेले तरी
सेनापतीलाच इतिहासात नोंदवावं लागतं
निर्मिकाचं आपलं बरं असतं
भोग मात्र आपण भोगतो
अन कितीही भोगलं तरी
नाव मात्र त्याचंच घेतो
फार थोड्यांचंच असं बरं असतं
बाकीच्यांचं काही खरं नसतं
आपणच त्यांना मोठे करतो
अन आपणच शेवटी खोटे ठरतो
------गणेश गोडसे--------
* पूर्वप्रसिद्ध*Monday, February 20, 2017
रांगोळी
रांगोळी
एका
उमलत्या शालीन संध्याकाळी,
रांगोळी काढताना तुला पाहिलं...
मनाला उगीच वाटलं,
तुझ्या रांगोळीनं,
सारं जगच नटलं...
------ गणेश गोडसे-----
एका
उमलत्या शालीन संध्याकाळी,
रांगोळी काढताना तुला पाहिलं...
मनाला उगीच वाटलं,
तुझ्या रांगोळीनं,
सारं जगच नटलं...
------ गणेश गोडसे-----
रात्र रंग
*रात्ररंग*
रात्र - रंग
नाद काळोखात
उशाचा दिवा
चिंब मन-वात
रात्र जागी
उभा साज
मुके अवकाश
कोरे आवाज
मंद स्पंदनात
हरवलं स्वत्व
मंतरलं विश्व
शून्य अस्तित्व
रात्र न्हाते
तुझ्या उन्हात
उशाचा दिवा
चिंब मन-वात
*गणेश गोडसे*
पूर्वप्रसिद्धी - किर्लोस्कर फेब्रुवारी 1999
रात्र - रंग
नाद काळोखात
उशाचा दिवा
चिंब मन-वात
रात्र जागी
उभा साज
मुके अवकाश
कोरे आवाज
मंद स्पंदनात
हरवलं स्वत्व
मंतरलं विश्व
शून्य अस्तित्व
रात्र न्हाते
तुझ्या उन्हात
उशाचा दिवा
चिंब मन-वात
*गणेश गोडसे*
पूर्वप्रसिद्धी - किर्लोस्कर फेब्रुवारी 1999
Subscribe to:
Posts (Atom)
Featured post
-
अक्षरमानव प्रकाशन पुणे यांच्याकडून माझा 'पाणी घातल्या झाडांची पानगळ' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. PANI GHATLYA ZADANCHI P...
-
संभ्रमात मी सखे... संभ्रमात मी सखे का चांदण्यात तुझे कवडसे चालतो एकटाच मी वाटेवरी तुझे ठसे भास हे हवे हवे पुन्हा पुन्हा तुझे उन्मेष...
