Showing posts with label आई. Show all posts
Showing posts with label आई. Show all posts

Sunday, December 31, 2017

आई

आई


रात्रीतून,
तीनतीनदा  उठून…
पांघरूणातून  बाहेर  आलेले
इवले इवले हात  पाय
आई लपेटते
पुन्हा पुन्हा
मायेच्या  गोधडीत…
अंथरूण  झालेलं  पांघरूण
पुन्हा  करते  नेटकं.
आईच्या  अंगी
साठत  जाते उब
ईश्वराच्या  मनातल्या
गाभ्यातली.
आई होत जाते
अधिकाधिक  उबदार
पौषातल्या  चढत्या
थंडीच्या  प्रत्येक रात्रीबरोबर…
                                    31/12/2017

-- गणेश गोडसे ---

Featured post

तुला घरच नाही