Showing posts with label Kavita. Show all posts
Showing posts with label Kavita. Show all posts

Saturday, July 13, 2019

पाणी घातल्या झाडांची पानगळ

अक्षरमानव प्रकाशन पुणे यांच्याकडून माझा 'पाणी घातल्या झाडांची पानगळ' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. PANI GHATLYA ZADANCHI PANGAL
त्याचे हे मुखपृष्ठ.
AKSHARMANAV PRAKASHAN PUNE

Monday, February 27, 2017

चांदण्या



पूर्वी,
तू हसायचीस तेव्हा,
चांदण्या कशा रांगेत उभ्या रहायच्या,
कवायतीला उभं राहणाऱ्या शाळकरी मुलांसारख्या.

पण आज,
तू हसलीस तेव्हा ,
चांदण्या उधळल्यासारख्या वाटल्या,
मैदान कवेत घेणाऱ्या शाळकरी मुलांसारख्या...


                                    ---गणेश गोडसे---

Monday, February 20, 2017

रात्र रंग

*रात्ररंग*

रात्र -  रंग
नाद काळोखात
उशाचा दिवा
चिंब मन-वात

रात्र जागी
उभा साज
मुके अवकाश
कोरे आवाज

मंद स्पंदनात
हरवलं स्वत्व
मंतरलं विश्व
शून्य अस्तित्व

रात्र न्हाते
तुझ्या उन्हात
उशाचा दिवा
चिंब मन-वात

              *गणेश गोडसे*
  पूर्वप्रसिद्धी - किर्लोस्कर फेब्रुवारी 1999

Featured post

तुला घरच नाही