Tuesday, December 21, 2021

रात्र मौनाच्या मिठीतली...

 

मौनाच्या मिठीत जेव्हा रात्र काजळून येते

उशाशी अलगद तेव्हा कोणी फुले ठेऊन जाते

 

डोहाचे असते पाणी पहुडलेले शांत शांत

हलकेच येऊन कोणी  तळ ढवळून जाते

 

पाणी घातल्या सावली चाखल्या झाडांची पानगळ

इवले इवले मंतरलेले मोत्यांचे थेंब देऊन जाते

 

कशी लिहावी मौनाची व्याकूळ गाणी कोणी

कविता देऊन जेव्हा कोणी शब्दांना घेऊन जाते

 

काळजातून उगवलेले गजबजलेले गाव माझे

गाव नावे करून कोणी गाव सोडून जाते


No comments:

Post a Comment

Featured post

तुला घरच नाही