काल तुझ्या स्मरणांची गर्दी
ओघळली माझ्या डोळ्यांतून
सळसळली पाने मोहरलेली
गदगदली झाडे आतून आतून
फुले आली जमून सारी
स्पर्श तुझा सांगायला
थुईथुईले कारंजे असे
लागले हसू तुझे उमलायला
चाफा असा अलगद गळला
दरवळला नेत्री देह तुझा
मोगरा लागला सांडू
घमघमला रानी स्नेह तुझा
नित्याचेच होऊन बसले
माझे येथे असे येणे आता
येतेस तू अवचित कोठूनही
गात्रे आतुरली तुझ्या स्वागता
Tuesday, December 21, 2021
बाग
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
अक्षरमानव प्रकाशन पुणे यांच्याकडून माझा 'पाणी घातल्या झाडांची पानगळ' हा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. PANI GHATLYA ZADANCHI P...
-
संभ्रमात मी सखे... संभ्रमात मी सखे का चांदण्यात तुझे कवडसे चालतो एकटाच मी वाटेवरी तुझे ठसे भास हे हवे हवे पुन्हा पुन्हा तुझे उन्मेष...
No comments:
Post a Comment