Monday, February 27, 2017

चांदण्या



पूर्वी,
तू हसायचीस तेव्हा,
चांदण्या कशा रांगेत उभ्या रहायच्या,
कवायतीला उभं राहणाऱ्या शाळकरी मुलांसारख्या.

पण आज,
तू हसलीस तेव्हा ,
चांदण्या उधळल्यासारख्या वाटल्या,
मैदान कवेत घेणाऱ्या शाळकरी मुलांसारख्या...


                                    ---गणेश गोडसे---

No comments:

Post a Comment

Featured post

तुला घरच नाही