Tuesday, February 21, 2017

.... बरं असतं

....  बरं  असतं



हाकणाऱ्याचं आपलं बरं असतं
ओढणाऱ्याला मात्र ओढावं लागतं
अन ओढणारे ओढून मेले तरी
नाव मात्र हकणाराचंच होतं

सेनापतीचं आपलं बरं असतं
सैन्याला मात्र लढावं लागतं
अन लढणारे लढून मेले तरी
सेनापतीलाच इतिहासात नोंदवावं लागतं

निर्मिकाचं आपलं बरं असतं
भोग मात्र आपण भोगतो
अन कितीही भोगलं तरी
नाव मात्र त्याचंच घेतो

फार थोड्यांचंच असं बरं असतं
बाकीच्यांचं काही खरं नसतं
आपणच त्यांना मोठे करतो
अन आपणच शेवटी खोटे ठरतो

                ------गणेश गोडसे--------
                        * पूर्वप्रसिद्ध*

1 comment:

  1. काय मस्त लिहिताय दादा। आपलं हे अंग माहित होत पण खूपच प्रगल्भ वाटलं व्वा ...

    ReplyDelete

Featured post

तुला घरच नाही