Saturday, December 11, 2021

काहीतरी ....

एका पहाटवेळी,

सूर्याने

काळोख उलगडण्याआधी

 

ठिबकत होतं धुकं

पानांपानांवरून

शहारत होती ती

जसं मोरपिस ओठांवरून

 

तेव्हा

धुक्यासारखं

काहीतरी मनातलं

आक्रंदत होतं

तुझ्या विश्वाच्या वेशीवरून

धुकं पानांवरून...?

मोरपिस ओठांवरून...??


No comments:

Post a Comment

Featured post

तुला घरच नाही