Saturday, December 11, 2021

तुझं मौन

 

तुझं  मौन 

आयुष्यभर  जगत  आलोय  मी

 

माझं  प्राक्तन  झालेलं  तुझं  मौन

जेव्हा  माझ्याशी  बोलू  लागतं

तेव्हा  ऐकू  येऊ  लागतात  मला

तू    उच्चारलेले  शब्द

मी  जातो  त्या  अदृश्य  शब्दांना  शरण

 

माझं  सर्वस्व  वाहतो

तुझ्या  मौनाच्या  चरणाशी

 

तुझं  मौन  पाझरत  असतं

मेंदूतून  सदैव

नखशिखान्त  पसरून

माझ्या  पावलांनी  तुडवलेल्या  मातीतही

झिरपत  राहतो  तुझ्या  मौनाचा

गढूळ  गंध

No comments:

Post a Comment

Featured post

तुला घरच नाही