Friday, December 31, 2021

तोरण

 

माझ्या

जुन्या घराच्या उंबरठ्यावर

लखलखणारे अजून तोरण

तू स्पर्शिल्या रांगोळीला

तुझेच अजूनी तरूण कोंदण

 

तू

मला अर्पिल्या त्या क्षणांचे

माझ्यापुरते आयुष्य चिरंतन

तारूण्य तुझे ते न सरणारे

जोवरी माझे श्वास निरंतर

 

तुझ्या

मोहाचे अत्तर जडशीळ

देहातून गेले कधीचे सांडून

अंत ना पण तुझ्या असण्याला

दर्पणी अजूनी तुझेच स्पंदन

 

माझ्या

जुन्या घराच्या उंबरठ्यावर

लखलखणारे अजून तोरण

तू स्पर्शिल्या रांगोळीला

तुझेच अजूनी तरूण कोंदण

No comments:

Post a Comment

Featured post

तुला घरच नाही