प्रवासाला निघाल्यावर ,
एखादी गोष्ट ,
विसरल्याची जाणीव व्हावी,
चुकल्या-चुकल्यासारखं,
काहीतरी अपुरं वाटावं,
तसं काहीसं ,
मलाही होऊ लागलंय
,
कुठे निघालोय
मी ?
काय विसरलोय
?
हि पोकळी कसली ?
प्रश्न मनाशी गर्दी करतात...
आसमंत अंधारून
जातो ...
अन्
लख्कन वीज चमकावी
,
तशी तुझी आठवण होते.
अन्
प्रकाशमान
होते ,
ती जीवघेणी
पोकळी ...
No comments:
Post a Comment